नगर – साईदीप हॉस्पिटल हे एक उत्कृष्ठ व तत्पर हॉस्पिटल आहे. जिथे आरोग्यउपचार व सामाजिक बाधिलकी जपली जाते असे, गौरवउद्गार अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यानी व्यक्त केले.
साईदीप हॉस्पिटल तर्फे ऑर्थोपेडिक दिना निमित्त शहर वाहतूक पोलीस यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिरा आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, साईदीप हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. एस. एस. दीपक, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ रवींद्र सोमाणी, डॉ हरमीत कथूरिया, डॉ.अश्विन झालानी, डॉ. गणेश सारडा, डॉ.पायल धूत व शहर वाहतूक पोलीस कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले की, जिल्ह्या पोलीस दलाला नेहमी साईदीप सहकार्य असते. लॉकडाऊन काळात पोलीस कर्मचारी दिवसरात्र ड्यूटी करीत आहे. ज्यामुळे नागरिकांना घरात सुरक्षित रहावे म्हणून समाजिक बंधीलकी जपत साईदीप हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. डॉ.दीपक म्हणाले की, करोनाच्या संक्रमण काळात आरोग्य तपासणी खुप महत्वाचे असून, कुठल्याही नैसर्गिक आपत्तिच्या काळात साईदीप हॉस्पिटल सामाजिक बांधिलकीसाठी नेहमी अग्रेसर राहिल.