Free Silai Machine Yojana 2023: भारतात सर्वाधिक फसवणूक ही नोकरीच्या नावाखाली होत असते. तर सध्याच्या काळात सरकारी योजनांच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून लोकांकडून पैसे उकळले जात असल्याची प्रकरणेही समोर येत आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात असतात ते अशा साइटवर विश्वास ठेवतात आणि त्यांची फसवणूक होते.
आता मोफत सिलाई मशीन योजना 2023 ( Free Silai Machine Yojana 2023) व्हायरल होत आहे. सरकार मोफत शिलाई मशीन योजनेंतर्गत लोकांना मोफत शिलाई मशीन देत असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव वापरले जात आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेचा दावा काय आहे? –
फसवणूक करणाऱ्यांनी मोफत शिलाई मशिन योजनेसाठी काही अटीही घातल्या असून त्यात 20 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आर्थिक दुर्बल आणि पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, असे सांगण्यात येत आहे.
दावा: देश की महिलाओं को रोजगार प्रदान करने के लिए केंद्र सरकार द्वारा “प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना 2023” के तहत महिलाओं को फ्री में सिलाई मशीन उपलब्ध करवाया जा रहा है#PIBFactCheck
✅ केंद्र सरकार ऐसी कोई योजना नहीं चला रही है
✅ यह ठगी का एक प्रयास है,कृपया सावधान रहें pic.twitter.com/G6LBeDAcu5
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 7, 2023
मोफत शिलाई मशीन योजना खोटी –
मात्र ही संपूर्ण योजना बनावट आहे. सध्या शासनाकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाहीए. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेच्या फॅक्ट चेक युनिटने हे बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना चालवत नसल्याचे पीआयबीने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे, कृपया काळजी घ्या, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.