बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूपच व्यग्र आहे. कार्तिकने नुकतेच आपल्या “भूलभुलय्या 2’चे शूटिंग पूर्ण केले होते. त्यांनतर कार्तिक आर्यनने आपल्या बहुचर्चित ‘फ्रेडी’ चित्रपटाचं शूटिंग देखील पूर्ण केले आहे. याचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांना माहिती दिली आहे.
कार्तिक आर्यनचा “फ्रेडी’ हा चित्रपट गेली अनेक दिवस चर्चेत आहे. हा चित्रपट एकता कपूरचा असून तो प्रथमच एकता कपूरसोबत काम करत आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावरून आनंदही व्यक्त केला होता. गेल्या महिन्यातच कार्तिकने “फ्रेडी’चे शूटिंग सुरू केले होते. अवघ्या 2 महिन्यांत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. कार्तिकने सेटवरील सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत सर्वांशी हा आनंद शेअर केला आहे.
फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात अभिनेत्री म्हणून अलाया फर्निचरवाला आहे. अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. तर ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांची नात आहे. कार्तिक आर्यन आणि अलाया पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
“फ्रेडी’ची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. शूटिंग पूर्ण झाल्याने चाहते खुश झाले आहेत. “फ्रेडी’ हा चित्रपट एक “रोमॅंटिक थ्रिलर’ चित्रपट असणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करणार आहे.