मुंबई – जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”…
नुकतंच ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला असून, या पर्वामध्ये प्रत्येक जण टिकून राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबत काही
सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिझन प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरत आहे.
बॉग बॉसच्या घरातील सदस्यांचा वावर, कार्यातील कामगिरी आणि फुल्ल ड्रामा अश्या सर्वच गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सध्या घरातील अनेक सदस्यांच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.
अजून पुढे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय झालं जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.