मुंबई – विराट कोहलीला सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही तो 48 धावांवर बाद झाला. या सामन्यादरम्यान त्याची भेट त्याचा आदर्श व आयडॉल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी झाली. तुमची भेट झाल्यावर नेहमीच प्रेरणा मिळते व आनंद वाटतो, असे कोहलीने सचिनशी बोलताना व्यक्त केले.
याचवेळी त्याला सचिनने काही टिप्सही दिल्याचे सांगितले जात आहे. या दोन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या चर्चेकडे बेंगळुरू व मुंबई दोन्ही संघांतील अन्य खेळाडूंचे लक्ष होते.
दरम्यान, बंगळुरू आणि मुंबई यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आयपीएल 2022 चा 18 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरूच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला. यात कोहलीने 48 धावा करत आरसीबीला शानदार विजय मिळवून दिला.
जर आरसीबीच्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाने IPL 2022 मध्ये चार सामने खेळले आहेत आणि तीन सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला. याआधी राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव झाला होता. संघाने पहिला सामना 5 विकेटने गमावला होता.