मुंबई – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्या रिलेशनशीपची नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगलेली दिसते. अनेकदा हे दोघे एकत्र विदेशात ट्रीपला जातात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान, हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. मात्र सबा हृतिकपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यावरून तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र आता एका मुलाखतीदरम्यान तिने हृतिकसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
एका मुलाखती दरम्यानला सबा लव्ह लाईफबद्दल विचारण्यात आले होते. त्याबाबत ती म्हणाली की, “प्रत्येकजण स्वतःच्या संघर्षांना तोंड देत असतो. पण हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, असे मला वाटते. लोकांना इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. आपण त्याबद्दल काय करू शकतो? फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका. हसत राहा आणि पुढे जा. या फार लहान गोष्टी आहेत व मी करत असलेल्या कामाचा एक भाग आहे. हा माझ्या जीवनाचा एकच भाग आहे.”
दरम्यान, सबा आझाद आणि हृतिक रोशन काही दिवसांपूर्वी अर्जेंटिना येथे गेले होते. हृतिक आणि सबाचे येथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. यावेळी येथील दोघांचे फोटो अनेकांच्या पसंतीस पडले होते. तर काहींना त्यांना ट्रोलही केले होते. “आपल्या पत्नीला सोडून हृतिक लहान मुलीसोबत फिरत आहे,” असे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले होते.
सबाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने 2008 मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, परंतु 2011 मध्ये आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाद्वारे तिला यश मिळाले. शेवटची ती ‘रॉकेट बॉईज 2’ या चित्रपटात दिसली होती. तर हृतिक लवकरच ‘फाइटर’ चित्रपटात दिसणार आहे.