माळेगाव, (वार्ताहर)- समाजात महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एस. पी. सराफ प्रा. लीचे उपक्रम कौतुकास्पद असतात, असे गौरवोद्गार माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी काढले.
महिला दिनाचे औचित्य साधून माळेगाव येथील एस. पी. सराफ प्रा.लीमिटेडचे संचालक शिवाजी क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगर पंचायत माळेगावचे प्रशासकीय अधिकारी आदित्य भुतकर, प्रमोद जाधव, प्रकाश क्षीरसागर व महिला उपस्थित होत्या. यावेळी मंडलाधिकारीपदी निवड झालेल्या प्रियांका क्षीरसागर, महिला पोलीस रुपाली धीवार, योगिता जाधव, अर्चना बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली शहा,
नगर पंचायतीच्या रेश्मा शेख, माया कदम, स्वच्छता महिला कर्मचारी मयुरी माळवदकर, रेश्मा मांढरे, मंगल भोसले, देवई भोसले, रेखा शिंदे व अन्य महिलांना साडी-चोळी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शाम क्षीरसागर यांनी केले. ज्ञानेश्वरी क्षीरसागर यांनी आभार मानले.
ग्राहकांची विश्वासार्हता
माळेगाव येथील एस. पी. सराफ प्रा.लीमिटेडचे संचालक शिवाजी क्षीरसागर यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील गरजू लोकांना मदत केली जाते. तसेच समाजाप्रती उत्तरदायित्व या भावनेतून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. या पेढीच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जा, गुणवत्ता दिली जात आहे. त्यामुळे विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.