रशिया इतक्‍यात तेल उत्पादन वाढवणार नाही

बिजींग – अमेरिकेने इराणकडून तेल आयात करण्यास इतर देशांनाबंदी घातल्यानंतर त्यानिर्णयाचा तेल उत्पादनावर जागतिक परिणाम होणार आहे. अशा वेळी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन करून ही दरी भरून काढली जाईल अशी अपेक्षा होती पण इतक्‍यात तेल उत्त्पादन वाढवायचे नाहीं असा आमचा निर्णय झाला आहे असे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी म्हटले आहे. ते आज येथे वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की आम्ही किती प्रमाणात तेल उत्पादन करायचे याविषयी आमचा अन्य तेल उत्पादक देशांच्या संघटनेशी करार झाला आहे. त्यामुळे आम्हाला त्या मर्यादेतच तेल उत्पादन करावे लागणार आहे त्यामुळे आम्हाला हे उत्त्पादन वाढवता येणार नाही.

हा करार जुलै महिन्यात संपणार आहे त्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी नमूद केले. येत्या 2 मे पर्यंत इराणकडून तेल आयात करणे थांबवा अशी सुचना अमेरिकेने भारतासह अन्य देशांना केली आहे.त्याचा जागतिक इंधन मार्केटवर काय परिणाम होईल याचा अंदाज मला आत्ताच बांधता येणार नाही असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.