मॉस्को – रशियातील केमेरोव्ह भागातल्या एका खासगी नर्सिंग होमला लागलेल्या आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे नर्सिंग होम कायदेशीरपणे चालविण्यात येत होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजधानी मॉस्कोच्या पूर्वेला 3 हजार किलोमीटर अंतरावरील केमेरोव्ह शहरात एका लाकडी बांधकामाच्या इमारतीमध्ये हे नर्सिंग होम चालवले जात होते. मात्र या ठिकाणी आपत्कालीन व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास संस्थेने म्हटले आहे.
ही इमारत भाड्याने देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तपास संस्थेने या व्यक्तीची ओळख उघड केली नाही. मात्र हा स्थानिक पालक असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
ही आग पहाटेच्या सुमारास भडकली.
मात्र या आगीचे नेमके कारण स्पष्ट समजू शकलेले नाही. मात्र या इमारतीतील कोळशावर चालवला जाणारा बॉयलर बिघडला होता, असे काही रहिवाशांनी तपास संस्थेला सांगितले. या आगीमध्ये अन्य 6 जण जखमी झाले आहेत. या आगीमध्ये ही दोन मजल्याची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली.