IPL 2023 Auction – आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना मोठी ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या लिलावात खेळाडूचे नाव आल्यानंतर त्याच्यावर एखाद्या संघाने बोली लावणे हीदेखील अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण या लिलावात अनेक खेळाडूंच्या नावाची घोषणा होते, मात्र मोजक्याच खेळाडूंना या लिलावात बोली लावली जाते. त्यामुळे नवख्या खेळाडूंसाठी किती रुपये मिळाले यापेक्षा बोली लावली गेली हे महत्वाचे आहे. आयपीएलच्या लिलावांमध्ये अनेकवेळा बिकट परिस्थितीतून आलेल्या खेळाडूंना मोठ्या किमतीची बोली लागलेली आपण पहिले आहे.
“आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी…”, ख्रिस गेलने व्यक्त केली इच्छा!
आयपीएल 2023 साठी झालेल्या मिनी लिलावात देखील अशाच एका बस चालकाच्या मुलाला बोली लावली गेली. केरळचा अब्दुल बसीथ हा एका बस चालकाचा मुलगा असून तो आता राजस्थान रॉयल्स संघासाठी संजू सॅमसनसोबत आयपीएलमध्ये खेळणार आहे. अब्दुलचे वडील हे केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा आता आयपीएलमध्ये मोठमोठ्या दिग्ग्गज खेळाडूंना भिडणार आहे.
“आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी…”, ख्रिस गेलने व्यक्त केली इच्छा!
आयपीएल लिलावात विदेशी खेळाडूंच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण केली जाते. काळ झालेल्या लिलावात इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्ज संघाकडून 18 कोटी 50 लाख रुपयांची ऐतिहासिक बोली लावली गेली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च केले. इंग्लंडच्या बेन स्टोक्ससाठी चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपये एवढी रक्कम मोजली.
Abdul Basith, son of a KSRTC Driver from Ernakulam joins @rajasthanroyals. Nervous Basith left home when #IPLAuction started. When he returned,family was waiting with cake! Basith’s father was away for Sabarimala duty and couldn’t join.@IamSanjuSamson pic.twitter.com/U3lWjRNhBx
— Joby George (@JobySports) December 23, 2022
मात्र, याच आयपीएल लिलावामध्ये अब्दुलासारख्या खेळाडूंना बोली लागल्याने भारतीयांमध्येही सकारात्मक भावना पाहायला मिळते. राजस्थान रॉयल्स संघाने अब्दुलसाठी 20 लाख रुपये खर्च केले आणि त्याला आपल्या संघात घेतेले आहे. अब्दूलला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्या आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा झालाय. त्याची निवड झाल्याने कुटुंबाने केक कापून अब्दुलच अभिनंदन केलं आहे. अब्दुल फलंदाजीसह गोलंदाजीतही पटाईत आहे. त्याने केरळ संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.