मेष : ग्रहांची साथ
ग्रहांची साथ मिळेल. आर्थिक सुधारणा होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम राहा. इतरांना तुमची एखादी कल्पना पटली नाही, तरीही त्याच कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. नोकरीत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील. कामात “शॉर्ट कट’ घेऊन काम संपवाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास होईल. तरुणांना साहस, धाडस करावेसे वाटेल.
वृषभ :कामाचा व्याप वाढेल
योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब कराल. कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलेल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने पैशांची नड भागेल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असेल, त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. अधिकारही प्राप्त होईल.
मिथुन : यश येईल
परिस्थितीनुरूप तुम्ही तुमच्या ध्येय-धोरणांत बदल केलात तर त्याचा लाभ होईल. व्यवसायात पैशांची चणचण जाणवली तरी तात्पुरती पैशांची सोय होईल. वायफळ खर्चावर बंधन ठेवा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.
कर्क : आर्थिक स्थिती चांगली
पैशांची आवक-जावक समसमान राहील. व्यवसायात जी कामे हाती घेतली होती, त्यांना वेग येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. विशिष्ट कामासाठी जोडलेले संबंध संपुष्टात येतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. थोडी चिडचिड होईल; परंतु न रागावता कामे करीत राहा. भावनिक चढउतार/वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.
सिंह : धनलाभाची शक्यता
आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रत्येक काम हाती घ्याल. व्यवसायात कंटाळवाणी कामे संपल्याने हायसे वाटेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत गरजेनुसार वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल. जोडधंदा असल्यास अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळेल. घरात तरुणांना नवीन मित्रमंडळींचे आकर्षण वाटेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील.
कन्या : संधीचा फायदा घ्या
“अंथरूण पाहून पाय पसरा’ व्यवसायात नवीन योजनांना मूर्तस्वरूप देता येईल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे जादा भांडवलाची उभारणी करावी लागेल. पैशांची सोय होईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी. बोलण्याने जवळची माणसे दुरावण्याची शक्यता आहे. घरात लांबलेले कार्य ठरेल. तरुणांनी मिळणाऱ्या संधीचा फायदा उचलावा.
तुळ : परदेशगमनाचा मानस
आर्थिक स्थैर्य व दिलासा देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामे नियंत्रणात ठेवण्यात यश येईल. सरकारी कामात सुधारणा होईल. नवीन व्यक्तींशी हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कंटाळवाणे कामे संपेल. कामानिमित्ताने परदेशगमनाचा मानस राहील. मनाजोगता खर्च करता येईल. घरात नवीन जागा खरेदीसंबंधीचा निर्णय होईल.
वृश्चिक : अपेक्षित पैसे मिळतील
कामावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यावर तुमचा भर राहील. व्यवसायात योग्य व्यक्तींशी संपर्क साधून कामे मार्गी लावाल. सण-उत्सवानिमित्ताने नवीन योजना आखून विक्री व उलाढाल वाढवाल. नोकरीत नवीन कामाची सुरुवात होईल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. अपेक्षित पैसे मिळतील.
धनु : विशेष लाभ
वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून प्रगती करण्याचा मानस असेल. त्यात यश मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. बॅंका व वित्तीय संस्था, इ. ची मदत खेळते भांडवल उभारणीसाठी होईल. नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. स्वतः लक्ष घालून कामे पूर्ण कराल. सहकारी कामात मदत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील.
मकर : चांगली बातमी कळेल
विश्वासार्हता पडताळून इतरांवर कामे सोपवलीत तर बरीच कामे मार्गी लागतील. व्यवसायात संमिश्र ग्रहमान राहील. जुने काम संपून नवीन कामे हाती घ्याल. बाजारातील चढ-उतारांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. नोकरीत आपल्या मर्यादा ओळखून कामे करा. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. तरुणांचा आनंद द्विगुणित करणारी घटना घडेल.
कुंभ : प्रश्न सुटतील
साशंकता न ठेवता कामे करीत रहा. कामाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. व्यवसायात आवश्यक तेव्हा निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. पैशांचा मोह टाळा. तुम्ही तुमचे कौशल्य दाखवा. मोठ्या खर्चाचा बोजा तुमच्यावर येईल. मात्र, केलेल्या कामाचे समाधान मिळेल. महिलांनी वैचारिक देवाण-घेवाण केली तर बरेच प्रश्न सुटतील. तरुणांनी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा.
मीन : प्रवासाचे बेत
ग्रहमानाची साथ राहील. काही कामे अनपेक्षितरीत्या मार्गी लागतील. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले जातील. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. त्यामुळे जादा सुख-सुविधा मिळतील. जुन्या हितसंबंधांना उजाळा मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. घरात छोटा समारंभ ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. महिलांना गृहसौख्य मिळेल.