मेष : यशदायक ग्रहमान
कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्वास बाळगू नये. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील. महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता मिळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
वृषभ :नवीन संधी मिळेल
ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्यता, तरी नाराज होऊ नका. नोकरीत नवीन संधी चालून येतील. प्रवासयोग. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल. स्वाथ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष राहावे लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
मिथुन : गुरू-रविची साथ
गुरू-रविची उत्तम साथ मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागीदारीतून विशेष लाभ होईल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील. मान-सन्मान मिळेल. महिलांना यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरुणांना विवाहयोग येतील. नवपरिणितांना भाग्योदय.
कर्क :धनप्राप्तीचे योग
व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नका. खरेदी-विक्रीतून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. महिलांना सुवार्ता कळेल. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबतीतील चिंता मिटेल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक ग्रहमान.
सिंह : नवीन कामे मिळतील
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल कराल. यशाची मदार तुमच्यावर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तींनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. कामानिमित्ताने प्रवास घडेल. सामाजिक, धार्मिक कार्यांत मात्र प्रगती होईल, प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल. मानापमान बाळगू नये.
कन्या : परिस्थितीत बदल होईल
पैशांच्या व्यवहारात चोखंदळ राहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. जुनी येणी वसूल होतील. देणी देता येतील त्यामुळे तणाव कमी होईल. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थितीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील, ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल.
तुळ : गुरू, शुक्र फलदायी
गुरू, शुक्र विशेष फलदायी ठरतील. व्यवसायात हरतऱ्हेने लाभ होतील. सुवार्ता कळेल. विचार व कृती यांचा समन्वय साधून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. वादाच्या प्रसंगापासून चार हात लांब रहा. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. महिलांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. वेळ मजेत जाईल.
वृश्चिक : विशेष लाभ होईल
व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल. पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येतील. धनलाभाची शक्यता. हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. महिलांनी सामंजस्याने वाद व भांडणे सोडवावीत. विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत.
धनु : यशाची कमान उंचावेल
कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशांची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमचेवर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवली जाईल. नवीन वास्तूत राहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभ घटना साजरी कराल.
मकर : आर्थिक लाभ
व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्त्वाची कामे गती घेतील. आर्थिक लाभ होईल. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचे बेत गुप्त ठेवा. सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा करू नका. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना उत्तम यश मिळेल. भाग्योदय होईल. महिलांना मान-मरातब मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
कुंभ : अनुकूल ग्रह
रवि, मंगळ, बुध, इ. सारखे महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्ताराचे बेत यशस्वी होतील. परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. विरोधकांच्या कारवायांचा अचूक अंदाज येईल. नोकरीत बढती मिळेल. बेकारांना नोकरी मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मात्र मानसिक व शारीरिक आरोग्य जपावे लागेल. अतिसाहस करू नये. दगदग, धावपळही कमी करावी.
मीन : शुभ बातमी कळेल
नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नावर विश्वास ठेवावा. यशप्राप्ती होईल. व्यवसायात अशक्य वाटणाऱ्या कामात उत्तम प्रगती होईल. पैशांची स्थिती उत्तम राहील. नोकरीच्या कामात बिनचूक राहणे लाभदायक ठरेल. कुसंगत टाळा, आजचे काम आजच पूर्ण करा. महिलांनी सामोपचाराने वागून कामे मार्गी लावावीत. आवडत्या छंदातून व उपक्रमांतून प्रसिद्धी मिळेल. संततीबाबत शुभ बातमी कळेल. विवाह जमतील.