Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : तीन निवडणुका, तीन प्रयोग, पुढे काय?

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 9:18 am
A A
रूपगंध : तीन निवडणुका, तीन प्रयोग, पुढे काय?

सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की राजकारणातील बेरीज-वजाबाक्‍यांची समीकरणे वेग धरू लागतात. नव्या आघाड्या-युत्या आकाराला येतात. यामध्ये बहुतेकदा सौदेबाजी होते; तर काही वेळा अस्तित्वाचा प्रश्‍न म्हणूनही छोटे पक्ष आपल्याहून मोठ्या पक्षांशी आघाडी करतात. पण समाजवादी पक्षासारख्या राजकीय पक्षाने गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका घेत धक्‍कातंत्राच्या अवलंबाची हॅट्ट्रिक केली. आता 2024 मध्ये अखिलेश यादव नवा प्रयोग करण्याची शक्‍यता आहे. त्यांचा हा चौथा प्रयोग कसा असेल आणि तो यशस्वी होईल का, हे पाहणे रंजक ठरणारे आहे.

समाजवादी पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगळा प्रयोग केला. परंतु त्यांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. उत्तर प्रदेशात पराभवाची “हॅट्ट्रिक’ करणारे अखिलेश यादव यांचा चौथा पेपर आता 2024 मध्ये होणार आहे. आतापासूनच त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. कोलकाता येथे लवकरच समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत असून त्यात पक्षाचा निवडणूक आराखडा तयार करण्याबरोबरच विचारमंथन होण्याची शक्‍यता आहे.

समाजवादी पक्षावर ताबा मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये आपल्यातील नेतृत्वगुणांची परीक्षा दिली. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. अखिलेश यादव यांनी निवडणूक प्रचार सुरू करत असताना अचानक कॉंग्रेसशी आघाडी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. अखिलेश यादव आणि राहुल गांधी या दोन तरुण नेतृत्वाने निवडणूक काळात भरपूर प्रचार केला. परंतु जनतेने या तरुण नेत्यांना नाकारले. ही नाराजी एवढी होती की, समाजवादी पक्षाला 50 पेक्षा कमी आणि कॉंग्रेसला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. अखिलेश यादव यांचा प्रयोग विचित्र होता. कारण समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि वडील मुलायमसिंह यांनी कॉंग्रेसपासून नेहमीच दोन हात दूर राहणे पसंत केले. अर्थात अखिलेश यादव यांनी वडिलांचा विचार पाळला नाही आणि पराभवाचे तोंड पाहावे लागले.
2019 मध्ये दुसरा प्रयोग केला. लोकसभा निवडणूक काळात त्यांनी बसपशी आघाडी केली. यासाठी त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना कसे तयार केले असेल, हे कळत नाही.

म्हणूनच लखनौच्या गेस्ट हाउस प्रकरणानंतर कट्टर विरोधक बनलेल्या बसपसमवेत आघाडी करत अखिलेश यांनी पुन्हा आश्‍चर्याचा धक्‍का दिला. सत्ताधारी भाजपसाठी ही आघाडी धोक्‍याची घंटा ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांनी मत मांडले. दोघांची एकत्रित आकडेवारी ही भाजपपेक्षा अधिक होती. परंतु वास्तविक रुपात हे आकडे खरे ठरतातच असे नाही. कधी कधी जातीय समीकरणेदेखील पहावयास मिळतात. सप-बसपला हाच अनुभव आला. या आघाडीला जागा मिळवता आल्या नाहीत. बसपला 11 व सपला केवळ पाच जागा मिळाल्या. मोदी सरकारला सत्तास्थानी ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशने महत्त्वाची भूमिका बजावली. तिसरा प्रयोग अखिलेश यादव यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत केला. अखिलेश यादव यांनी पश्‍चिमेत राष्ट्रीय लोकदल यांच्याशी आघाडी केली. पण हा डावदेखील फसला.

तीन निवडणुका, तीन प्रयोग आणि तीन पराजय. या निवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य हे अखिलेश यादव यांच्या गळाला लागले खरे, पण निकालात त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. आता चौथी निवडणूक 2024 मध्ये होत आहे. त्यात अखिलेश यादव यांची रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ते पुन्हा नवीन प्रयोग करतील की यापूर्वी केलेल्या प्रयोगात सुधारणा करून तेच डावपेच आखतील हे पाहावे लागेल. अर्थात कोणत्याही संमेलनात किंवा परिषदेत एखाद्या निवडणुकीची रणनीती ठरविता येत नाही. परंतु भावी वाटचालीबाबत अंदाज आणि आकलन करता येते. विधानसभेला मौर्य यांच्या नेतृत्वाखाली अतिमागास जातीतील मंत्र्यांना आणि आमदारांना योगी सरकार आणि भाजपपासून तोडून अखिलेश यादव यांनी महत्त्वाकांक्षी योजना आखली. पण जसजसे विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत गेले तेव्हा ही याजना कमकुवत ठरत गेली. स्वामी प्रसाद मौर्य हे स्वत: पराभूत झाले आणि योजना देखील बासनात गुंडाळली गेली.

अखिलेश यादव हे गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसप्रती कठोर भूमिका घेत आहेत. कदाचित ठरावीक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे समाजवादी पक्षाकडून पारंपरिक मतदारसंघ रायबरेली आणि अमेठी येथे उमेदवार उभा न करता कॉंग्रेसला पाठिंबा दिला जातो. परंतु यंदा ते उमेदवार उभे करण्याची रणनीती आखू शकतात. अशा प्रकारचे पाऊल टाकतील का, असे आताच म्हणणे घाईचे ठरू शकते. परंतु सध्या समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यातील ताणाताणीत वाढ करून अखिलेश हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पक्षाला आपल्याकडे ओढण्यास यशस्वी ठरू शकतात. प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांत तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी अखिलेश यांची जवळीक वाढत आहे. ममता बॅनर्जी यांची जवळीक सर्वश्रूत आहे. विधानसभेच्या वेळी त्या प्रचारालादेखील आल्या होत्या. त्यामुळे सपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कोलकाता येथे होणे आश्‍चर्य वाटण्यासारखे नाही. कोलकाता येथे दोघे ऐक्‍य दाखवत तिसऱ्या आघाडीबाबत प्रामाणिक राहताना दिसले तर आश्‍चर्य वाटू नये.

– अमित शुक्‍ल

Tags: rupgandhThree electionsthree experimentswhat next?

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व
रूपगंध

रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व

4 days ago
रूपगंध : घरभर दरवळणारा सुगंध
रूपगंध

रूपगंध : घरभर दरवळणारा सुगंध

4 days ago
रुपगंध : चीनमध्ये कुटूंबव्यवस्थेचे आव्हान
रूपगंध

रुपगंध : चीनमध्ये कुटूंबव्यवस्थेचे आव्हान

2 weeks ago
रुपगंध : अवघा रंग एकचि झाला…
रूपगंध

रुपगंध : अवघा रंग एकचि झाला…

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

US : अमेरिकेत शालेय कर्मचाऱ्यांवर गोळीबार; हल्लेखोर आढळला मृतावस्थेत

Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

काय सांगता ! ब्रेक अपनंतर बॉयफ्रेंडला चक्क मिळाली आर्थिक नुकसानभरपाई…

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामगिरीत खा. बारणे दुसऱ्या स्थानी

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या खेळाडूची भारतीय खोखो संघात निवड

अवघ्या सातव्या वर्षी सायकलवरून सलग 51 किलोमीटरचा प्रवास

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा चिंचवड येथे प्रारंभ

सामाजिक आणि आर्थिक विकासात स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वाची – आयुक्त शेखर सिंह

फडणवीस-ठाकरेंनी एकत्र चालत जाणं नवे राजकीय संकेत आहेत का ? संजय राऊत म्हणतात.”ज्या पद्धतीचे राजकारण…”

Most Popular Today

Tags: rupgandhThree electionsthree experimentswhat next?

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!