इंदोर – मध्य प्रदेश राज्यात निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशात अशातच काँग्रेसने या निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे. मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे. “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.
काँग्रेस ने ट्विट केले आहे की,’आरएसएसच्या सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये नाराजी, मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येणार आहे दरम्यान या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक सर्वेक्षणे समोर आली असून त्यात राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजपच्या जागा ५५ पेक्षा कमी होत आहेत. 2018 मध्ये काँग्रेसचे 15 महिने कार्यकाळ आहे आणि कमलनाथ जी सारख्या निर्विवाद आणि अनुभवी नेत्याचा पाठिंबा आहे. यासह ती लोकांपर्यंत पोहोचत आहे.
भाजपकडे 18 वर्षांची जबाबदारी आणि अपूर्ण घोषणा आहेत ज्याने गंभीर सत्ताविरोधी लाटेचे रूप धारण केले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 संदर्भात गेल्या 5 महिन्यांत 6 वेगवेगळी सर्वेक्षणे समोर आली आहेत. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. एवढेच नाही तर भाजपच्या सर्वेक्षणातही पक्षाचा पराभव होत आहे.’ असं म्हणत मध्यप्रदेशात काँग्रेसच निवडणून येणार असल्याचा दावा केला आहे .