sanjay raut – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांची वर्तणूक गुन्हेगारांना संरक्षण देऊन त्यांना आणखी गुन्हे प्रवृत्त करायला लावणारी आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास झालेल्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना फटकारल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हा आरोप केला आहे.
ते म्हणाले की,अध्यक्ष एखाद्या खुन्याला आश्रय देऊन त्याला असे आणखी गुन्हे करण्यास प्रोत्साहन देत असल्यासारखे काम करत आहे. त्यांना कायदा माहित नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
देशात कायदा आहे, संविधान आहे आणि त्यावर देखरेख ठेवणारी सर्वोच्च न्यायालयासारखी व्यवस्था आहे, याची दखल त्यांना घ्यावीच लागेल. मनमानीपद्धतीने त्यांना वागता येणार नाही असेही राऊत यांनी यावेळी नमूद केले.