Rohit Pawar – मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटी (Sarati) गावात जाहीर सभा घेतली आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक सभास्थळी उपस्थित राहिले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर देखील निशाणा साधला.
जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी यावेळी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असं देखील जरांगे यावेळी म्हणाले.
या सभेदरम्यान घडलेल्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी “महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना हे शोभणारं नाही..’ असे विधान केले आहे. या संदर्भातील ट्विट रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “अत्यंत पोटतिडकीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला.
अत्यंत पोटतिडकीने #मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या #ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे,… pic.twitter.com/gP7v80VhGd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2023
त्यांच्या या ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे सोशल मीडिया पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे हे महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही.
काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने मराठा समाजाला द्यावा, ही विनंती!’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.