लखनौ – सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उंपात्य फेरीत रितूपर्णा दासला पराभव पत्कारावा लागला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत थायलंडच्या फित्तायापोर्न चैवानने रितूपर्णा दासचा २४-२२, २१-१५ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही लढत ३९ मिनिटे चालली. चैवानचा हा रितुपर्णावरील दुसरा विजय ठरला.