मुंबई – पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडल या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.
रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. पुन्हा एकदा रानू मंडल यांनी गाण्याची रेकॉर्डिंग केली आहे. त्या हिमेश रेशमिया यांचे सुप्रसिद्ध ‘आशिकी में तेरी’ या गाणे रिकॉर्ड करताना दिसत आहे. ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ या चित्रपटातील ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याचा रेकॉर्डिंगनंतर हे त्यांचे दुसरे गाणे आहे.
दरम्यान, रानू मंडल गायक हिमेश रेशमिया नंतर आता ‘इंडियन आयडॉल’ शोचा विजेता सलमान अली सोबत गाताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द सलमानने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला. त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत.