Riteish Deshmukh : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. बॉलीवूड चित्रपटांना तोड देत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सुपरहिट ठरलेल्या वेड या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत.
रितेश देशमुखने ‘वेड’ चित्रपटाला एक वर्ष झाल्यानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रितेशच्या आईच्या हस्ते सेटवर मुहूर्ताचा शॉट पार पडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘सुख कळले’ या लोकप्रिय गाण्याचा तो शॉट होता. आईच्या हस्ते शुभारंभ झाला होता. रितेशने शूट दरम्यान घडलेल्या बिहाईंड द सीन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करत रितेश लिहितो की , “हे सगळंच अविश्वसनीय होते. कधी एक वर्ष पूर्ण झालं समजलंच नाही. गेल्यावर्षी आम्ही दोघंही या दिवसात थोडेसे दडपणाखाली होतो परंतु, त्यानंतर तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून धन्य झालो. तुमचीच टीम ‘वेड’” रितेश देशमुखने शेअर केलेल्या या खास व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून, तर जिनिलीयाचा मराठी कलाविश्वात अभिनेत्री म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती.