पंतची क्रमवारीत झेप, कोहलीची घसरण

दुबई – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी कसोटीत सरस कामगिरी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने क्रमवारीत 45 व्या स्थानावरुन थेट 26 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर, भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे.

सिडनी कसोटीपूर्वी पंत कसोटी क्रमवारीत 45 व्या स्थानावर होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 36 तर, दुसऱ्या डावात 97 धावांची वादळी खेळी केल्यावर त्याने 26 वे स्थान मिळवले आहे. बदली कर्णधार अजिंक्‍य रहाणे व विराट कोहली यांच्या क्रमारीत घसरण झाली आहे.

कोहली दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर तर, रहाणे सहाव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे.

चेतेश्वर आठव्या स्थानावर आला आहे. क्रमवारीत पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तर, दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर तर, रवीचंद्रन अश्विन सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरला आहे. जोश हेजलवूड पाचव्या क्रमांकावर असून भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जरी आत्ता जडेजाला स्थान मिळाले असले तरीही त्याची पुढे घसरण होणार आहे. त्याला दुखापत झाल्यामुळे चौथ्या कसोटीत खेळता येणार नसून आगामी इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींनी मुकावे लागमार आहे. त्यामुळे दोन आठवड्यांनंतर आयसीसी नवी क्रमवारी जाहीर करेल व त्यात जडेजाच्या स्थानात घसरण होणार आहे. मात्र, जडेजा जर या संपूर्ण मालिकेला मुकला तर त्याचे क्रमवारीतील स्थान पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीतही नसेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आता भारतीय खेळाडू चौथ्या व अखेरच्या सामन्यात कशी कामगिरी करतात यावरच कोहली वगळता अन्य खेळाडूंचे क्रमवारीतील स्थान निश्‍चित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.