#AUSvIND : …तर आम्ही जिंकलो असतो – विहारी

सिडनी – चेतेश्‍वर पुजारा आमि ऋषभ पंत आणखी पाच ते सात षटके जरी खेळले असते तरी आम्ही सिडनी कसोटी जिंकली असती, असे मत हनुमा विहारीने व्यक्त केले आहे.

पुजारा व पंत खेळपट्टीवर स्तिरावले होते. पंत आक्रमक फलंदजी करत होता. त्याचे शतक केवळ 3 धावांनी हुकले मात्र, त्याने विजयाचा पाया रचला होता. आणखी काही काळ हे दोघे खेळले असते तर संघाचा विजय साकार झाला असता, असेही विहारीने सांगितले.

पायाचा स्नायू दुखावल्यानंतरही सिडनी कसोटीतील पाचव्या दिवशी संयमी फलंदाजी करत भारताचा पराभव टाळत सामना अनिर्णीत राखला. विहारीने रवीचंद्रन अश्विनच्या साथीत पाचव्या दिवसाचे तिसरे सत्र खेळून काढले.

अश्विनने दिलेला सल्ला लाभदायक ठरला. त्यामुळेच आम्ही तीन तासांपेक्षा जास्त काळ खेळून काढला. मला दुखपत झाली नसती व पुजारा आणि पंत यांनी आणखी काहीवेळ मैदानावर तग धरला असता तर सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला असता, असेही विहारी म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.