Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) लवकरच ‘झिम्मा 2’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे. यातच आता या चित्रपटात रिंकुची एंट्री झाल्याने चाहते देखील आनंदी आहेत. मात्र झिम्मा 2′ नंतर रिंकु राजगुरु आणखी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच तिने तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आणि त्यातील तिच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिंकूच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘आशा’ आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिंकू हिरवी साडी, गळ्यात मंगळसूत्र अशा सुंदर लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत रिंकूने कॅप्शन दिले की, “आशा हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आमच्या अतिशय खास प्रोजेक्टचं पूर्ण झाला आहे. लवकरच भेटू!”
View this post on Instagram
रिंकूने शेअर केलेल्या या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे. रिंकूने हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, रिंकू राजगुरू ‘सैराट’ या चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. यानंतर ती आता ‘झिम्मा-2’ चित्रपटात झळकणार आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.