मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) देखील सिनेक्षेत्रात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अल्पावधीतच ती बॉलीवूडमध्ये स्वत: वेगळी ओळख निर्माण करत आहे. परंतु अभिनयासह जान्हवी तिच्या फॅशनमुळे देखील अधिक करून ओळखली जाते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर नेहमीच जान्हवी कपूर तिचे हटके फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने नवे फोटोशूट केले आहेत. यातील तिचा हॉट अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. इंस्टग्रामवर जान्हवी कपूरने ऑफ शोल्डर ड्रेस कॅरी केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा जबरदस्त लुक दिसतोय.
या फोटोमध्ये तिने अतिशय डीप नेकचा ड्रेस घातला आहे. जान्हवी कपूरचा हा बोल्ड फोटो पाहून चाहत्यांनाही तिच्या सौंदर्याचे वेड लागले. पीच कलरच्या टॉप आणि स्कर्ट जान्हवी एकदम मादक दिसत आहे. मैसी हेयर बन, लाइट मेकअप आणि मिनिमल एक्सेसरी अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर ‘बवाल’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तिच्या सोबत अभिनेता वरून धवन मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे तिने पहिल्यांदाच वरुण धवन याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर जान्हवी कपूरचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट देखील रिलीज झाला आहे.