नवी दिल्ली – स्टार गायिका रिहाना तिचा प्रियकर रॉकीसोबत लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. दरम्यान, रिहानाने आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे. रिहानाचे नाव फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही सामील झाले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत तिने प्रथमच स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतून ही माहिती मिळाली आहे.
कॉस्मेटिक उत्पादने कंपनीद्वारे कमाई
फोर्ब्सनुसार, रिहानाची एकूण संपत्ती 1.7 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनात सुमारे १२६१८. ६८ कोटी रुपये आहे. रिहानाची कमाई तिच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट कंपनी ‘फेंटी ब्युटी’ (Fenty Beauty) द्वारे झाली आहे.
२०१७ मध्ये कॉस्मेटिक ब्रँड लाँच करण्यात आला
२०१७ मध्ये, रिहानाने फ्रेंच लक्झरी फॅशन-सौंदर्य उत्पादन कंपनी LVMH च्या सहकार्याने Fenty Beauty नावाचा कॉस्मेटिक ब्रँड सुरू केला. रिहानाची Fenty Beauty मध्ये 50 टक्के हिस्सेदारी आहे. अलीकडेच बार्बाडोस देशाने तिला ‘नॅशनल हिरो’ ही पदवी दिली. येथे पंतप्रधान मिया मोटले यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रिहानाला या पदवीने सन्मानित करण्यात आले.
बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानाचे खरे नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. ‘डोन्ट स्टॉप द म्युझिक’, ‘लव्ह द वे यू लेट’, ‘अम्ब्रेला’ सारखी सुपरहिट गाणी देणारी रिहाना सोशल मीडियाची क्वीन देखील आहे.