मुंबई – भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचं संबंध आहे. सत्ताधारी असो वा विरोधक कुणाच्याही कामाची, दखल गडकरी लगेच घेतात. असाच अनुभव महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आला आहे.
कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक जिंकल्यापासून रोहित पाटील राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. रोहित पाटील यांनी नुकतीच दिल्लीला जाऊन कवठेमहांकाळ नगर पंचायतीच्या कामासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटाची किस्सा रोहित यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
रोहित पाटील म्हणाले, दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” ह्या वाक्याची प्रचिती आज आली. “आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज” हे वाक्य धीराचे होते. आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली.
“दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” ह्या वाक्याची प्रचिती आज आली.
“आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज” हे वाक्य धीराचे होते.
आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. pic.twitter.com/mKJqVmRwIf— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) April 5, 2022
रोहित पुढं म्हणाले की, कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी गडकरी साहेबांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली.