अमाप संपत्तीच्या मालकीण आहेत भारतातील ‘या’ सर्वाधिक श्रीमंत महिला ! ‘फोर्ब्ज’ने घेतली ‘यांची’ दखल

नवी दिल्ली : महिला कोणत्याही अर्थाने पुरुषांपेक्षा कमी नाहीत, हे आपण आजच्या काळात अनेक वेळा पाहिले आहे. ज्या स्त्रियांना निर्णय घेण्याचा अधिकार कधीच नव्हता, आज त्या त्यांच्या यशाचे सोपान रचत आहेत. फोर्ब्स मासिकाच्या यादीतून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावेळी अब्जाधीशांच्या यादीत मोठ्या संख्येने महिला दिसल्या. जगातील श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात भारतातील 6 महिलांनी आपले स्थान पक्के केले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला कोण आहेत ते जाणून घेऊया.


* सावित्री जिंदाल

या यादीत सावित्री जिंदाल या यादीत 7 व्या स्थानावर आहेत. ओपी जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. गेल्या वर्षी 6.6 अब्ज डॉलरची त्यांची संपत्ती 2021 मध्ये 18 अब्ज डॉलर (1.34 लाख कोटी रुपये) झाली आहे. सावित्री जिंदाल एक व्यापारी असण्याबरोबरच ओपी जिंदाल समूहाच्या अध्यक्षा एमरिटस आहेत आणि महाराजा अग्रसेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्ष पदावर आहेत.

* विनोद राय गुप्ता
भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत विनोद राय गुप्ता यांचे दुसरे नाव. इलेकट्रीकल्स पासून अप्लायन्सेसपर्यंत विविध उपकरणे बनविणाऱ्या हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता यांची संपत्ती 2021 मध्ये 7.6 अब्ज डॉलर आहे, जी गेल्या वर्षी 3.55 अब्ज डॉलर होती. फोर्ब्सच्या यादीत त्या 24 व्या क्रमांकावर आहेत.

* लीना तिवारी
यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारी या यादीत 43 वे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. लेखिका, प्राणीप्रेमी, नर्तिका आणि होममेकर असणाऱ्या लीना यांची संपत्ती 3 अब्ज डॉलरवरून 4.4 अब्ज डॉलर झाली आहे. लीना व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांची कंपनी USV लिमिटेड अँटी डायबेटिक औषधे तयार करते.

* दिव्या गोकुळनाथ
बायजू लर्निंग ऍपच्या सहसंस्थापिका दिव्या गोकुळनाथ फोर्ब्सच्या यादीत 47 व्या स्थानावर आहेत. त्याची निव्वळ संपत्ती एक वर्षापूर्वी 3.05 अब्ज डॉलर होती आणि आता 2021 मध्ये ती 4.05 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या वर्षी त्याच्या संपत्तीत सुमारे 1 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दिव्या गोकुळनाथ यांनी ऍप लाँच केल्यानंतर काही वर्षांनीच हे स्थान प्राप्त केले. दिव्या गोकुळनाथ यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शिक्षिका म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी बेंगळुरू स्थित ऑनलाइन शिक्षणप्रणाली ‘बायजू’ चे साम्राज्य निर्माण केले. आज त्याचे मूल्य 12 अब्ज डॉलर्स आहे.

* किरण मजुमदार शॉ
भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत किरण मजुमदार पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची निव्वळ संपत्ती गेल्या वर्षी 4.6 अब्ज डॉलरवरून 3.9 अब्ज डॉलरवर आली आहे. शॉ या एक भारतीय उद्योजिक आणि आयआयएम-बंगलोरच्या अध्यक्षा, बायोकॉन लिमिटेड या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 2014 मध्ये विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ओथम सुवर्ण पदक देण्यात आले.

* मल्लिका श्रीनिवासन
इंडस्ट्रीच्या आयर्न लेडी मल्लिका श्रीनिवासन फोर्ब्सच्या यादीत 73 व्या क्रमांकावर आहेत. श्रीनिवासन मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर टैफे (TAFE) च्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी 1986 साली त्या TAFE मध्ये सामील झाल्या. त्यांच्या मेहनतीने, विश्वासाने आणि चिकाटीने मल्लिकाने उच्च तंत्रज्ञानावर आधारित TAFE ही कंपनी बनवली. भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.