पुणे(प्रतिनिधी) – विधिज्ञ मंचतर्फे आयोजित वकिलांच्या राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल विधिज्ञ मंचच्या फेसबुक पेजवर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. डॉ. सुधाकर अव्हाड यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक ठाणे येथील अॅड. कौस्तुभ बांबरकर, द्वितीय क्रमांक कराड येथील अॅड. स्नेहल जाधव आणि तृतीय क्रमांक पुणे येथील अॅड. चंद्रसेन कुमकर यांना जाहीर करण्यात आला.
करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये वकील वर्गाला बौद्धिक चालना मिळावी आणि वकिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विधीज्ञ मंचातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. अॅड.अतुल पाटील यांच्या संकल्पनेने अॅड.मिलिंद पवार आणि अॅड.योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.
या संपूर्ण ऑनलाइन आणि पेपरलेस स्पर्धेत महाराष्ट्रातील राज्यातील वकिलांनी सहभाग घेतला होता. निबंध स्पर्धेसाठी मानवाधिकार आणि भारतीय न्यायालये, न्यायालयात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, वकिली व्यवसाय आणि वकिलांच्या बार कौन्सिलकडून असणाऱ्या अपेक्षा हे विषय देण्यात आले होते. अंतिम विजेत्यांची निवड ज्येष्ठ विधीज्ञ मुख्य परीक्षक अॅड.सुधाकर अव्हाड, अॅड. शिरीष शिंदे, अॅड. प्रशांत माने यांनी केली. ही ऑनलाइन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सचिन हिंगणेकर, अॅड. विकास मुसळे, अॅड.पवन कुलकर्णी, अॅड.संजय शितोळे, अॅड.गणेश लोळगे, अॅड.निखिलेश पोटे, अॅड.विश्वास खराबे, अॅड.ऋषिकेश जाधव, अॅड.महेंद्र खांदवे, अॅड.सुवीर जोगदंड यांनी सहकार्य केले.