सुप्रिम कोर्टाने सरकारकडून मागवला प्रतिसाद
नवी दिल्ली – महिलांना देशातील सर्व मशिदींमध्ये मुक्त प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे त्यांची या बाबतची भूमिका स्पष्ट करण्याची सुचना केली आहे.
सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली आहे त्या अनुषंगाने कोर्टाने यावर सरकारला त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे. यासमिन झुबेर अहमद पीरझादा नावाच्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका सादर केली आहे.
महिलांना आजही अनेक ठिकाणी मशिदीत प्रवेशाला अनुमती नाही. त्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याची कैफियत याचिकाकर्त्यांनी यात मांडली आहे. त्यावर आज कोर्टात प्राथमिक सुनावणी झाली.