#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग

पंतप्रधानांच्या विरोधात मतप्रदर्शनाला जोर

नवी दिल्ली – आज सकाळी, म्हणजे सोमवार दि. 19 एप्रिलपासून ट्‌वीटरवर #ResignModi अर्थात #रिझाईन मोदी म्हणजेच पंतप्रधान मोदी, तुम्ही राजीनामा द्या, हा हॅशटॅग ट्रेन्डींगमध्ये आला आहे. कोव्हिडची देशभरातली स्थिती पाहता, पंतप्रधान काहीच करत नसून ते आसाम, पश्‍चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात दंग आहेत, असे सांगत अनेकांनी या हॅशटॅगचर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तामिळनाडूतील एका व्यक्तीने हा हॅशटॅग सेट केला असून आता त्यावर अनेक जण मतप्रदर्शन करत आहेत. देशासह महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे, लसीची टंचाई आहे, रुग्णांना बेड्‌स आणि रेम्डिसिव्हरसारखी औषधेही मिळेनाशी झाली आहेत. पंतप्रधान देशभर लॉकडाऊनही लावत नाहीत; करोना ही राष्ट्रीय आपत्तीही जाहीर केली जात नाही.

मात्र, पंतप्रधान लसीची निर्यात करतात आणि निवडणूक प्रचारांत लंब्याचौड्या गप्पा मारतात; प्रत्यक्ष कृती काहीच करत नाहीत. सबब या व्यक्तीला पंतप्रधानपदी बसण्याचा नैतिक हक्क उरलेला नाही, असेही अनेकांनी म्हटले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनची जबाबदारी राज्यांवर सोपवली आहे. मात्र, देशात पंतप्रधान अस्तित्वात असल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, असे ट्रेन्ड नव्याने निर्माण होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.