केडगाव- दौंड तालुक्यातील आलेगाव आणि पानवली येथील दोन महिलांचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जगभरासह भारतात मागील महिनाभरापासू करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशातील प्रत्येक दिवसाची आकडेवारी भयानक येत असल्याने लॉकडाऊनमुळे अवघा देश बांधला गेला आहे मुंबई आणि पुणे शहरातील रुग्ण दिवसागणिक वाढतच आहे. पुण्यात तर मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची आजमितीस संख्या सर्वाधिक आहे.
पुण्यापासू 55 किलोमीटर अंतरावरील दौंड तालुक्यात मात्र सुदैवाने अजुनपर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही शेजारी बारामती तालुक्याला देखी या रोगाने ग्रासले आहे. दौंड तालुका अजुनपर्यंत तरी करोनाबाधीत यादीत नाही परंतु मागील चार दिवसांपूर्वी आलेगाव येथील एका महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला तातडीने त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आणि राहु बेटातील पानवली गावातील महिला शिक्रापूर (ता. शिरूर) येथील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली होती, सदर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या पानवली येथील महिलेलाही तात्काळ पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु या दोन्ही महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी सांगितले. दौंड तालुक्यात अजुनपर्यंत एकही रुग्ण नसल्याचे तात्पुरते समाधान दौंडकरांच्या चेहऱ्यावर दिसत असले तरी कोरोना विषाणूची भीती मात्र कायम आहे.