श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत राज्य सचिवालयावर तिरंगा झेंडासोबत राज्याचाही स्वतंत्र झेंडा फडकत होता. मात्र, कलम 370 रद्द करण्यात आल्याने राज्याचा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. त्यानंतर रविवारी श्रीनगर स्थित राज्य सचिवालयाच्या इमारतीवरील जम्मू-काश्मीरचा झेंडा उतरविण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतरही काही दिवसांपासून राज्य सचिवालयात दोन्ही झेंडे फडकत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या सर्व कार्यालय आणि इमारतींवर आता फक्त तिरंगा फडकविण्यात येणार आहे. कलम 370 हटविल्याने भारतीय दंड संहिता आणि संविधान आता जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आले आहे. यानुसार रविवारी राज्य सचिवालयात फक्त तिरंगा झेंडा फडकविण्यात आला.