मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी छगन शिंदे यांनी एक एकर क्षेत्रातील कोबी पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या आहेत. तरकारी मालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी, वाटाणा, काकडी, बीट आदी तरकारी पिके घेतली आहेत; परंतु बाजारभाव नसल्याने भांडवली खर्चही वसूल होत नाही.
अवसरी खुर्द येथील शेतकरी छगन शिंदे यांनी एक एकर क्षेत्रातील कोबीच्या पिकात मेंढपाळाच्या मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या आहेत. छगन शिंदे यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.