पमालू : आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव बुधवारी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पलामू न्यायालयात हजर झाले. सतीश कुमार मुंडा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग आणि खासदार आमदार विशेष न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. लालूंच्या वतीने उच्च न्यायालयाचे वकील प्रभात कुमार सिंह न्यायालयात हजर होते.
Jharkhand | Former Bihar CM and RJD chief Lalu Prasad Yadav to appear before the special MP, MLA court in Palamu, in connection with a model code of conduct violation case of 2009; security tightened outside the court pic.twitter.com/tgWv86n4zA
— ANI (@ANI) June 8, 2022
याबाबत लालूंचे वकील धीरेंद्र कुमार सिंह उर्फ पप्पू सिंह यांनी सांगितले की, लालूंवर २००९ मध्ये गढवा जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पलामू कोर्टात सुनावणी झाल्यानंतर लालूंना आर्थिक दंडाची शिक्षा झाली आणि कोर्टाने त्यांची सुटका केली. लालूंना शिक्षा म्हणून ६००० रुपये द्यावे लागतील.कोर्ट सुनावणीसाठी उघडताच लालू यादव सकाळी साडेसात वाजता पलामू कोर्टात पोहोचले. पलामू न्यायालय परिसराबाहेर लालूंच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. न्यायालयाच्या आवाराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.