- दोन रुग्णांचा मृत्यू
- 267 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 181 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 94268 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर त्यापैकी 91032 जणांनी करोनावर मात केली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी चार वाजेपर्यंत शहरातील 180 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाला करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला. आज शहरातील एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी शहराबाहेरील आंबेगाव व तळेगाव ढमढेरे येथील दोघांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1716 व शहराबाहेरील 695 रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात 267 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91032 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3038 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1064 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 797 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 723 इतकी आहे.गेल्या 24 तासांमध्ये करोना चाचणीसाठी 3038 संशयित दाखल झाले. गेल्या आठ महिन्यांमध्ये शहरातील 5 लाख 9 हजार 786 नागरिकांची करोना चाचणी झाली आहे. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 25 टक्के आहे. त्यापैकी 4 लाख 14 हजार 454 जणांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयातून चौघे करोनामुक्त
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 12) 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. करोनामुक्त झालेल्या 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले. धानोरी, औंध, कडवे (ता. खेड) येथील रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 92 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह अन्य दोघांचा समावेश आहे. रुग्णालयातून शनिवारी घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये 65 वर्षीय ज्येष्ठासह अन्य 3 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. विशालनगर-जगताप डेअरी, पिंपळे गुरव, मांडकी (ता. पुरंदर) भोर येथील हे रुग्ण आहेत. रुग्णालयात सध्या 29 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील एका करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 156 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बरे झालेल्या 632 जणांना घरी सोडण्यात आले. 304 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. 652 जणांना होम क्वॉरंटाइन केले आहे.