अहमदनगर – राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये अग्रेसर असलेल्या युनियन बॅंक ऑफ इंडीयाच्या अहमदनगर नागापूर येथील नुतनीकृत क्षेत्रीय कार्यालयाचे उदघाटन बॅंकेचे प्रबंध निदेशक व मुख्य कार्यपालक अधिकारी राजकिरण राय यांचे हस्ते नुकतेच झाले.
या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेत अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, लातुर, उस्मानाबाद, बीड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. समाजातीत सर्व घटकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास बॅंक प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी राजकिरण यांनी यावेळी सांगीतले.
या उदघाटन समारंभास फिल्ड जनरल मॅनेजर राजीब एल पट्टनायक, अहमदनगर क्षेत्रीय प्रमुख अभिषेक जैन यांच्यासह अधिकारी, शाखाधिकारी उपस्थित होते.