अभिनेत्री रीम शेखने वयाच्या 19 व्या वर्षी इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर अतिशय धमाकेदार परफॉर्मन्स देत फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रीमने केलेल्या फोटोशूटची मनोरंजन क्षेत्रात जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो बघून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
रीम शेखने अल्पावधीतच घराघरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. रीमला पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री तिच्या अभिनया व्यतिरिक्त बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. रीमने मलाला युसूफझाईवरील ‘गुल मकई’ या बॉलिवूड चित्रपटात मलालाची भूमिका साकारली होती. तिने केलेल्या या अभिनयाचे सर्वीकडून कौतुक झाले होते.
त्यानंतर आता रीम पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा भाग बनली आहे. यावेळी अभिनेत्रीने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून यूजर्सचा घाम फुटला आहे. रीमच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवला आहे. अभिनेत्रीने अवघ्या 19व्या वर्षे मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.