पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 269 नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तसेच शहरात आज 238 जण करोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत शहरातील 2 लाख 59 हजार 969 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 3 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आजपर्यंत शहरातील 4301 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 293 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1093 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 282 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1375 इतकी आहे.