नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये अलीकडे झालेल्या सुधारीत नागरीकत्व विरोधी दंगलीला केरळमधील संघटना पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने अर्थपुरवठा केला असल्याचे इडीने म्हटले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
या संघटनेची अंमलबजावणी संचनालयातर्फे (इडी) मनी लॉंड्रींग प्रकरणात 2018 पासून चौकशी करत आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशातील बॅंकात या संघटनेने 120 कोटी रुपये जमा केले असल्याचे इडीने म्हटले आहे.
हा पैसा का कायद्या विरोधातील उत्तर प्रदेशातील निदर्शनांसाठी वापरला असावा असा संशय इडीने व्यक्त केला आहे. ईडीने आपला निश्कर्ष गृहमंत्रालयाला कळवला आहे.
दरम्यान, पीएफआयचे सरचिटणीस महंमद अली जिना यांनी याबाबतच्या वृत्ताचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. संघटनेच्या 73 खात्यातून 120 कोटी रूपये वळवण्यात आले आहेत. त्याचा वापर का विरोधी हिंसाचारासाठी केला गेला असे या अहवालात म्हटले आहे.