पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले आहे. मृत्यूसमई ते 99 वर्षाचे होते. बाबासाहेब यांच्या निधनानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी दुःख व्यक्त केले आहे.
https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1460065996123770880
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत बाबासाहेबांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. या जगविख्यात इतिहासकाराने, कठोर परिश्रमाने आणि एखादया प्रमाणे, प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता.
शिवशाहीर ही पदवी, आमच्या आजी कै.राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच, त्यांना सातारा येथे सन्मानाने बहाल केली होती. 1985 च्या दरम्यान जाणता राजा हे महानाटय मंचकावर आणुन बाबासाहेबांनी अव्दितिय कार्य केले. त्याचे काळाच्या पडदयाआड जाणे, मनाला चटका लावणारे आहे. बोलायला शब्दच नाहीत, इतिहास अभ्यासक्षेत्राचे तर कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांच्या एक्झीटमुळे झाले आहे.
आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना.