पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान,बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/mBKZNq5faX
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 15, 2021
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलंय. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, “अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”