अमेरिकेच्या संसद भवनातील हिंसाचार प्रकरणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले,…

न्यूयॉर्क : अमेरिके संसद भवनातंकाल अभूतपूर्व हिंसाचार घडवून आणण्यात आला. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हा हिंसाचार घडवून आणला होता. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याबद्दल मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचं राष्ट्र असायला हवं, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंसाचाराच्या या अभूतपूर्व परिस्थितीनंतर अमेरिकेन काँग्रेसमध्ये राज्यघटनेतील २५ व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांना मुदतीपूर्वीच पदावरुन हटवण्यात यावे अन्यथा त्यांच्यावर महाभियोग आणण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली. “प्रत्येक अमेरिकन नागरिकाप्रमाणे मी देखील हिंसाचार आणि अराजकता माजवल्यामुळे संतापलो आहे. त्यामुळे संसद भवन सुरक्षित करण्यासाठी आणि धुडगूस घालणाऱ्यांना हटवण्यासाठी मी तातडीने नॅशनल गार्ड आणि फेडरल लॉ इनफोर्समेंटला पाचारण केले.

अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचं राष्ट्र असायला हवं,” असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे बोलताना म्हटले. दरम्यान, आता अमेरिकन काँग्रेसने निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे २० जानेवारी रोजी नव्य प्रशासनाचे उद्घाटन होईल. आता सहज, सुव्यवस्थित आणि अखंडपणे सत्तेचं हस्तांतरण करण्यावर माझं लक्ष असेल, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

अमेरिकन काँग्रेसने काल जो बायडन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅऱिस यांना उपाध्यक्ष म्हणून प्रमाणित केले. यानंतर अमेरिकेत ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसद भवनाची तोडफोड आणि हिंसाचार घडवून आणला, जो संपूर्ण जगाने पाहिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.