मुंबई – “केजीएफ चॅप्टर 1’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. दमदार ऍक्शन जबरदस्त डायलॉग आणि तगडी स्टारकास्ट यामुळे केजीएफ चॅप्टर 1 ने तिकीट बारीवर जोरदार कमाई केली.
View this post on Instagram
कन्नड अभिनेता ‘यश’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आला होता. या चित्रपटामुळे यशला संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली. सध्या त्याचे फॅन्स “केजीएफ चॅप्टर 2′ (KGF chapter 2) मध्ये रॉकी भाईला पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहात आहेत.
दरम्यान, नुकतंच “केजीएफ चॅप्टर 2’चा (KGF chapter 2) दमदार टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या सीक्वलमध्ये यशसह अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF chapter 2) मध्ये यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. सध्या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून, अनेकांच्या व्हाट्सअप स्टेटसला हा टिझर दिसून येत आहे.
View this post on Instagram