साओ पावलो – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना उपचारांसाठी पुन्हा एकदा येथील अलबर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर असल्याने निदान झाले होते व त्यामुळेच त्यांच्यावर आता केमोथेरपी करण्यात येणार आहे.
81 वर्षांच्या पेले यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना केमोथेरपी झाल्यावर घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या मोठ्या आतड्यातील कॅन्सरवर गेल्या सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
ब्राझीलला तीन वेळा फुटबॉल विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या पेले यांची प्रकृती गेल्या वर्षीपासून सातत्याने खालावली होती. तेव्हापासून त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.