Live Cricket Score, RCB vs LSG Indian Premier League 2024 : आज, आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या आहेत.
Innings Break!
A solid innings from Quinton de Kock & a fine finish from Nicholas Pooran 👏👏#LSG set a target of 1️⃣8️⃣2️⃣ for #RCB
Will be chased or will #LSG get their 2nd win on the trot? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/ZZ42YW8tPz#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/6uJZpYxFOb
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
लखनौसाठी क्विंटन डी कॉकने 56 चेंडूत 81 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 5 षटकार आले. क्विंटन डी कॉकने 36 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. या खेळीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. एके काळी 14व्या षटकात लखनौची धावसंख्या 130 धावा होती. त्यानंतर लखनौ 200 चा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि लखनौची 18 षटकात 5 बाद 148 अशी स्थिती झाली होती. त्यावेळी धावसंख्या 170 पर्यंतच पोहोचेल असे वाटत होते, पण त्यानंतर पुरनने षटकारांचा वर्षाव केला. पुरन 21 चेंडूत 40 धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि 5 षटकार आले.
याव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुल 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. देवदत्त पडिक्कलला 11 चेंडूत सहा धावा करता आल्या. मार्कस स्टॉइनिस 15 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. आयुष बडोनीला खातेही उघडता आले नाही. लखनौने शेवटच्या पाच षटकांत दोन गडी गमावून 50 धावा केल्या. यामध्ये 19व्या षटकात 20 आणि 20व्या षटकात 13 धावांचा समावेश आहे.
बेंगळुरूकडून मॅक्सवेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याने 4 षटकात 23 धावा दिल्या. तर यश दयाल, रीस टॉप्ली आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी 1 गडी बाद केला.