आरबीआयची HDFC बॅंकेच्या कोण-कोणत्या सेवांवर बंदी? वाचा सविस्तर…

मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या एचडीएफसी बॅंकेच्या डिजिटल सेवा थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे खासगी क्षेत्रातील बड्या अशा एचडीएफसी बॅंकेला हा मोठा दणका असल्याचे मानण्यात येत आहे. तसेच नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यास तत्पुरती बंदी घातली आहे. 

एचडीएफसी बॅंकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे. एचडीएफसी बॅंकेच्या इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते. यामध्ये 21 नोव्हेंबर रोजी बॅंकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे. ज्यामुळे इंटरनेट बॅंकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.

या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्‍चित करण्यासही रिझर्व्ह बॅंकेने सांगितल्याचे एचडीएफसी बॅंकेने नमूद केले आहे. आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू, अशी हमी एचडीएफसी बॅंकेने दिली आहे.

या निर्बंधांचा बॅंकेच्या एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वासही एचडीएफसी बॅंकेने व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.