नियम मोडल्याने हसन रझाला डच्चू

लाहोर – पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझा याने करोनाचा नियम मोडल्यामुळे स्पर्धेतून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानात सध्या एक स्थानिक टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू असून त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य काही नियम तयार करण्यात आले होते. त्याचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची समजली जात असलेली कायदे आझम स्पर्धा येथे सुरू आहे. संघ व्यवस्थापनाची परवानगी न घेता संघाच्या हॉटेलमधून रझा बाहेर गेला होता.

करोनाचा धोका कायम असतानाही रझाने केलेले वर्तन नियमभंग ठरले. त्याची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याला समज दिली आहे. अर्थात त्याला आता या स्पर्धेतील पुढील सामनेही खेळता येणार नसल्याचेही मंडळाने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.