रत्नागिरी – के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन व रत्नागिरीतील चेसमेन संस्था यांच्या वतीने दरवर्षी आयोजित होत असलेली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनानुसार एकूण तीन गटांत घेण्यात येणार आहे. यंदा स्पर्धकांना विनाशुल्क स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय एलो रेटिंग गुण 2000 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले खेळाडू पहिल्या गटात (अ), एलो रेटिंग गुण 2000च्या खाली असलेले दुसऱ्या (ब) तर, एलो रेटिंग गुण 1500 असलेले खेळाडू तिसऱ्या गटामध्ये (क) पात्र आहेत. क गटाची स्पर्धा आजपासून, ब गटाची स्पर्धा 18 डिसेंबरपासून तर, अ गटाची स्पर्धा 24 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.