भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर 8.65 टक्‍के

नवी दिल्ली : 2018-19 या आर्थिक वर्षासाठी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर 8.65 टक्‍के ठेवण्यास अर्थमंत्रालयाने परवानगी दिली आहे. भविष्यनिर्वाह निधी या संस्थेने यावर्षी व्याजदर 8.65 टक्‍के असावा, असा ठराव मंजूर करून तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठविला होता. आता अर्थ मंत्रालयाने या ठरावावर शिक्‍कामोर्तब केले असल्यामुळे औपचारिक क्षेत्रातील सहा कोटी कामगारांना याचा लाभ होणार आहे.

सूत्रांनी सांगितले की, सर्व बाबीचा सर्वसमावेशक विचार केल्यानंतर 2018- 19 या वर्षासाठी निधीवरील व्याजदर 8. 65 टक्‍के ठेवण्यास मान्यता देण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून भविष्यनिर्वाह निधी वरील व्याजदरात वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात ईपीएफओच्या सदस्यांनी व्याजदरात वाढ करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली होती. त्या अगोदर हा व्याजदर 8.55 टक्‍के होता. मात्र, सध्या सर्वच क्षेत्रात कमी व्याजदराचे युग अवतरले आहे. त्यामुळे आगामी काळात निधीवरील व्याजदर फार वाढण्यास मर्यादा असल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.