चाहते अनेक दिवसांपासून ‘पुष्पा 2’ रिलीज होण्याची वाट पाहत होते आणि आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ‘पुष्पा 2’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
रश्मिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ‘पुष्पा 2’चा चमकणारा सेट दिसत आहे. ‘पुष्पा 2’ हा 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सीक्वल आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाने श्रीवल्लीची भूमिका केली होती. दुसऱ्या भागात रश्मिका तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
‘पुष्पा: द राइज’मध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबतची रश्मिका मंदान्नाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. रश्मिका आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच पुष्पा २ चा देखील आहे आणि तिने शूटिंग सुरू केले आहे. रश्मिकाने शूटचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, ‘नाईट शूट’. रश्मिकाने नुकतेच रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’चे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘पुष्पा 2: द रुल’ बद्दल बोलायचे तर, 2024 च्या सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. चित्रपटाचा पहिला भाग 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला आणि त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुमारे 300 कोटींची कमाई केली. आता चाहत्यांना 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा आहे. ‘
पुष्पा’चा पहिला भाग रिलीज होण्यापूर्वीच दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटातील काही दृश्ये शूट केली होती. पण नंतर त्यांनी चित्रपटाच्या कथेत काही बदल केले आणि आता त्या अनुषंगाने ‘पुष्पा 2’ पुन्हा शूट करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होत आहे.