नवी दिल्ली – रशीद खान, जगातील अव्वल फिरकी गोलंदाजांपैकी एक. त्याच्या खेळासाठी तसेच त्याच्या मदतीसाठी तो ओळखला जातो. हा फिरकी गोलंदाज अनेक प्रसंगी आपल्या देशासाठी पुढे आला आहे. यावेळीही रशीद खानने पुन्हा असेच काहीसे केले आहे, ज्याने चाहत्यांची तसेच संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत आणि त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
I learned with great sadness about the tragic consequences of the earthquake that struck the western provinces (Herat, Farah, and Badghis) of Afghanistan.
I am donating all of my #CWC23 match fees to help the affected people.
Soon, we will be launching a fundraising campaign to… pic.twitter.com/dHAO1IGQlq— Rashid Khan (@rashidkhan_19) October 8, 2023
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खान याने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतून मिळणारे सर्व मानधन अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात शेकडो नागरिक प्रभावीत झाले आहेत. त्यांच्या मदतकार्यासाठी या स्पर्धेतून मानधन म्हणून मिळणारी सर्व रक्कम दिली जाणार आहे.
इतकेच नव्हे तर त्याने आपल्या संघ सहकारी खेळाडूंनाही अशाच मदतीचे आवाहन केले आहे. तसेच अफगाणिस्तानचे नागरीक ज्या कुठल्याही देशात सध्या राहात असतील तर त्यांनीही पुढाकार घेत मदत करावी असेही आवाहन रशीदने केले आहे.